श्री रवळनाथ मंदिर , गोळप - Ratnagiri

4.8/5 based on 4 reviews

Contact श्री रवळनाथ मंदिर , गोळप

Address :

Ratnagiri, Maharashtra 415616, India

Postal code : 415616
Categories :

Ratnagiri, Maharashtra 415616, India
S
Sanket Hatiskar on Google

C
Chinmay Gogate on Google

A
Amit Ghanekar on Google

My kuldaivat
My fucked up
R
Raju Bonde on Google

ब्रह्मा-विष्णू-महेश - गोळप. आशुतोष बापट. रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरी पासून दक्षिणेला जेमतेम १५ कि.मी. वर वसलेले छोटेसे गोळप हे गाव. पावस गावाचे जणू जुळे भावंडच. या गोळप गावात आहे निसर्गाच्या कुशीत वसलेले ‘हरिहरेश्वर मंदिर’. मंदिर परिसर फारच देखणा. सर्वबाजूंनी झाडांनी वेढलेले हे ठिकाण. मंदिरापर्यंत जायला एक जांभ्या दगडाची पाखाडी उतरून जावे लागते. पाखाडी उतरतानाच मंदिर परिसर दिसू लागतो. फरसबंदीयुक्त बंदिस्त प्राकार. एका छोट्या दारातून मंदिर प्रांगणात प्रवेश होतो. आत गेल्यावर उजव्या हाताला दिसते एक छोटेसे व्यासपीठ. उत्सवात इथे नाटके सादर केली जातात. लाकडी खांबांचा सभामंडप असलेल्या या मंदिराच्या गाभाऱ्यात मूर्ती आहेत त्या ब्रह्मा विष्णू आणि महेशाच्या. मूर्ती फारच सुबक आणि देखण्या. मंदिरात त्या एकाशेजारी एक मांडून ठेवलेल्या. आपण दर्शन घेताना आपल्या सगळ्यात डाव्या हाताला आहे श्रीविष्णूची मूर्ती, मधोमध आहेत ब्रह्मदेव आणि आपल्या उजव्या हाताला शंकराची मूर्ती. वैशिष्ट्यपूर्ण आणि सालंकृत घडवलेल्या या मूर्ती प्रेक्षणीय आहेत. विष्णूची मूर्ती चार हातांची. वरद मुद्रेतील उजव्या खालच्या हातात पद्म, उजव्या वरच्या हातात शंख, डाव्या वरच्या हातात चक्र तर डाव्या खालच्या हातात गदा. मूर्तीशास्त्रानुसार अशा मूर्तीला ‘केशव’ विष्णू असे संबोधले जाते. किरीट मुकुट घातलेल्या देवाच्या कानात मकरकुंडले. त्रिवलयांकित गळा आणि गळ्यात एकावली, वैजयंतीमाला, फलकहार, त्यातला कौस्तुभ मणी छातीवर रुळलेला. खांद्यावर वैकक्षक, दंडात केयूर, कटीभागी मेखला. पायात पादांगद. अशा या सर्वांगसुंदर विष्णूमूर्तीच्या पाठीशी आहे प्रभावळ. आणि त्या प्रभावळीत कोरलेले दिसतात विष्णूचे दशावतार. उजव्या पायाशी खाली गरुड, तर दोन बाजूंना चवरी घेतलेले सेवक. सेवकांच्या पाठीशी आहेत हातात कमळ घेतलेल्या भूदेवी आणि श्रीदेवी. मधली मूर्ती ब्रह्मदेवाची आहे. ब्रह्मदेवाची मंदिरे भारतात तुलनेने खूप कमी आढळतात. गोळप इथली ब्रह्मदेवाची मूर्ती अतिशय सुबक आणि देखणी आहे. चार तोंडे असलेल्या देवाची तीन तोंडे आपल्याला दिसतात, तर चौथे तोंड पाठीमागे कोरलेले आहे. ब्रह्मदेवाला पितामह समजले जाते. त्यामुळे त्यांना दाढी दाखवली जाते. या मूर्तीत ब्रह्मदेवाच्या तीनही तोंडांना दाढी दाखवलेली आहे. देवाचे नेत्र अर्धोन्मिलित आहेत. देवाचा उजवा खालचा हात वरद मुद्रेत असून त्यात अक्षमाला आहे, तर खालच्या डाव्या हातात कमंडलू दिसतो. वरच्या दोन हातात अनुक्रमे स्रुक आणि स्रुवा ही यज्ञासाठी लागणारी उपकरणे दाखवलेली आहेत. पायाशी दोन्ही बाजूंना सेवक दाखवलेले आहेत. ब्रह्मदेवाच्या पाठीमागे असलेल्या प्रभावळीत कुठल्याच मूर्ती नाहीत. मात्र त्याच्या आजूबाजूला दोन्ही खांबांवर साधक, तपस्वी यांच्या मूर्ती दिसतात. आपल्याकडून बघताना सर्वात उजवीकडची मूर्ती आहे ती शिवाची. जटामुकुटधारी शिवाच्या कानात सर्पकुंडले आहेत. वरच्या उजव्या हातात डमरू तर वरच्या डाव्या हातात त्रिशूल दिसतो. खालच्या उजव्या हातात मातुलुंग हे फळ तर डाव्या हातात कापलेले शीर आहे. शिवाने ब्रह्मदेवाचे पाचवे शीर कापले आणि नंतर ते त्याच्याच हाताला चिकटून राहिले. पुढे १२ वर्षे भ्रमंती केल्यावर वाराणसी क्षेत्री ते गळून पडले अशी एक कथा आहे. त्या कथेनुसार इथे शिवाच्या डाव्या हातात कापलेले शीर दिसते आहे. एकावली, फलकहार, कटीभागी मेखला अशा अलंकारांसोबत दंडात नागबंध व्यवस्थितपणे कोरलेला दिसतो. देवाच्या पायाशी हातात पुष्पहार घेतलेले सेवक तर त्यांच्या मागे चवरीधारी सेवक दिसतात. उजव्या बाजूच्या सेवकाच्या पाठीशी शिवाचे वाहन नंदी कोरलेले आहे. ब्रह्मा-विष्णू-महेशाच्या या मूर्ती सुबक असून त्या एकाच कलाकाराने कोरलेल्या दिसून येतात. मूर्तींची उभे राहण्याची पद्धत, त्यांच्या अंगावर असलेले अलंकार एकसारखे कोरलेले आहेत. या तीनही देवतांच्या हातातील आयुधे यथायोग्य कोरलेली आहेत. ब्रह्मदेवाची चार तोंडे, त्याला असलेली दाढी अगदी नेमकी दिसून येते. मात्र ब्रह्मदेवाचा मुकुट हा नेहमी शंकरासारखा जटामुकुट दाखवला जातो. मात्र याठिकाणी तो विष्णूसारखा किरीटमुकुट दाखवला आहे. हे या मूर्तीचे एक निराळे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. साधारणतः तीन-चारशे वर्षे जुन्या असलेल्या या तीनही मूर्ती वाराणसीवरून आल्या गेल्या आहेत. अत्यंत सुबक, सुघड आणि देखण्या अशा या मूर्ती म्हणजे नुसत्या गोळपचेच नव्हे तर कोकणचे वैभव म्हणायला हवे.
Brahma-Vishnu-Mahesh - Golap. Ashutosh Bapat. In Ratnagiri district, it is about 15 km south of Ratnagiri. This is a small village located on a hill. Like the twin brothers of Pawas village. In this Golap village is the 'Harihareshwar Temple' situated in the midst of nature. The temple grounds are very beautiful. This place is surrounded by trees on all sides. To reach the temple, one has to go down a yellow stone cliff. As soon as Pakhadi descends, the temple premises become visible. Paving closed type. A small door leads into the temple precincts. Once inside, a small platform appears on the right hand side. Plays are performed here during the festival. The temple has a wooden pavilion with idols of Brahma, Vishnu and Mahesh. The idols are very beautiful and beautiful. In the temple they placed one next to the other. When you take darshan, you have the idol of Lord Vishnu on your left hand, Brahma in the middle and the idol of Lord Shiva on your right hand. These characteristic and ornate sculptures are spectacular. The idol of Vishnu has four arms. Padma in the lower right hand, conch in the upper right hand, chakra in the upper left hand and mace in the lower left hand. According to iconography, such an idol is called 'Keshav' Vishnu. Crocodiles ring in the ears of the crowned God. Trivalayankita neck and neck Ekavali, Vaijayantimala, Falakhara, Kaustubh Mani rolled on the chest. Vaikakshak on the shoulder, Keur in the penalty, belt around the waist The soles of the feet. Such an all-encompassing Vishnu idol has an effect on its back. And Dashavatar of Vishnu is engraved in that effect. The eagle at the bottom of the right foot, and the servant holding the chavari on both sides. Behind the devotees are Bhudevi and Sridevi holding lotus in their hands. The idol in the middle is of Brahma. Goddess temples are relatively rare in India. The idol of Brahma at Golap is very beautiful. We see three mouths of God with four mouths, while the fourth mouth is carved on the back. Brahma is considered to be the grandfather. So they are shown a beard. This idol shows the beard of all the three faces of Brahma. God's eyes are half-closed. God's right lower hand is in Varad mudra and has Akshama in it, while Kamandalu is seen in the lower left hand. In the upper two hands, the tools required for the yagna are shown as sruk and sruva respectively. Servants are shown on both sides of the foot. There are no idols in the influence behind Brahma. However, idols of seekers and ascetics can be seen on both the pillars around it. The idol on the far right is Shiva's. The crowned ones have serpents in Shiva's ears. Damru is seen in the upper right hand and Trishul in the upper left hand. Matulung is the fruit in the lower right hand and the severed head in the left hand. Shiva cut off the fifth head of Brahma and then it stuck to his own hand. There is a story that Varanasi region fell after wandering for the next 12 years. According to the story, Shiva's severed head is seen in his left hand. Nagbandh is neatly carved in the fine with ornaments like Ekavali, Falakhar, Lumbar Mekhla. Servants with wreaths at the feet of God are seen behind them. Shiva's vehicle Nandi is carved on the back of the servant on the right. These idols of Brahma-Vishnu-Mahesh are beautiful and can be seen carved by the same artist. The method of standing of the idols, the ornaments on their bodies are uniformly carved. The weapons in the hands of these three deities are properly engraved. The four mouths of Brahma, the beard he has, can be seen exactly. But the crown of Brahma is always shown as a crown like Shankara. But here he is shown a crown like Vishnu. This is a unique feature of this idol. All the three idols, which are about three to four hundred years old, have come from Varanasi. These idols, which are very beautiful, neat and beautiful, are not only beautiful, but also the glory of Konkan.

Write some of your reviews for the company श्री रवळनाथ मंदिर , गोळप

Your reviews will be very helpful to other customers in finding and evaluating information

Rating *
Your review *

(Minimum 30 characters)

Your name *